25 November 2024 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL
x

तुमचं SBI बँकेत खातं आहे का | असेल तर वाचा नवे नियम | काय फायदा काय तोटा

SBI, State Bank of India, SMS Alert, Minimum Monthly Balance

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट : SBI स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खातेधारकांच्या दृष्टीनं अनेक नव्या योजना आणि सेवा पुरवल्या जातात. त्यातच आता बँकेकडून आणखी एक भर टाकण्यात आली आहे. ही भर म्हणण्यापेक्षा बँकेकडून खातेधारकांना दिली जाणारी खास भेटच ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

कारण, ठराविक सेवांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया यापुढं खातेधारकांकडून पैसे आकारणार नसल्याचं बँकेच्याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं. एसएमएस अलर्ट आणि किमान राशीसाठी बँक आकारत असणारे पैसे यापुढं आकारले जाणार नाहीत. शिवाय अनावश्यक ऍपमुळं होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी म्हणून खातेधारकांनी #YONOSBI ऍपचा वापर करावा, असंही सांगण्यात येत आहे.

खात्याशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर खात्यासंदर्भातील माहिती पाठवण्यासाठी बँकेकडून यापूर्वी ठराविक रक्कम आकारली जात होती. पण, यापुढं खातेधारकांना ही रक्कम देणं बंधनकारक नसेल.

किमान राशी खात्यात नसल्यासही आकारले जात होते पैसे:
SBI मध्ये खातं असणाऱ्यांना किमान ३ हजार रुपये इतकी रक्कम खात्यात ठेवणं बंधनकारक होतं. असं न केल्यास त्या खातेधारकाकडून बँक पैसे आकारत असे. ही रक्कम ५० टक्क्यांहून कमी झाल्यास म्हणजेच बँकेला रकमेच्या स्वरुपात १० रुपये आणि जीएसटी द्यावा लागत होता. खात्यातील ठेव ७५ टक्क्यांहून कमी झाल्यास १५ रुपये आणि त्यावरील जीएसटी इतकी रक्कम खातेधारकानं देणं अपेक्षित होतं.

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने करोडो ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. SBI ने एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यानुसार आता मोफत ट्रान्झेक्शनची लिमिट संपल्यानंतर पुन्हा रक्कम काढल्यास दंड आकारला जाणार आहे. एवढेच नाही तर खात्यामध्ये तेवढे पैसे नसतील आणि ट्रान्झेक्शन फेल झाले तरीही दंड आकारला जाणार आहे.

स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. SBI ATM मधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार (ATM Withdrawal Rules) स्टेट बँकेच्या एटीएम’मधून ५ वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येतात. मेट्रो शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु आणि हैदराबाद सहभागी आहेत.

याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये SBI चे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा SBI ATM मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते.

पुरेसा बॅलन्स नसल्यास…
एसबीआयच्या दुसऱ्या नियमानुसार, एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत आणि तेवढे पैसे खात्यात नसतील तर तुमच्या प्रत्येक फेल ट्रान्झेक्शनला 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे आधी बॅलन्सची माहिती घेूनच पैसे काढावे लागणार आहेत.

तिसरा नियम….
जर खातेधारकाला एटीएममधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढाय़ची असल्यास त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठविला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमणधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही.

 

News English Summary: The money that the bank charges for SMS alerts and minimum amount will no longer be charged. It is also suggested that account holders should use the #YONOSBI app to reduce headaches caused by unnecessary apps.

News English Title: Now onward SBI Bank would not charge for SMS alerts and minimum monthly balance News Latest Updates.

हॅशटॅग्स

#StateBankIndia(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x