22 November 2024 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

श्रीराम जन्मभूमी मंदिरच्या निर्माणाला सुरूवात | बांधकामात लोखंडाचा वापर होणार नाही

Ayodhya Shri Ram Janmbhoomi Mandir, construction begins, No iron Use

अयोध्या, २० ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोद्धा राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या इंजिनिअर्स मंदिराच्या ठिकाणी मातीची तपासणी करत आहेत. येत्या पुढील तीन ते साडे तीन वर्षांमध्ये राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण केले जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी 36-40 महिन्यांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे. दरम्यान ट्रस्ट कडून अजून एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे या श्रीराम मंदिराच्या कामामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही.

दरम्यान रामजन्मभूमी मंदिर शिलान्यास आणि भूमिपुजनापूर्वीच राम मंदिराचे एक मॉडेल प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये भारतीय वास्तुकलेचं दर्शन घडवणारं मॉडेल चित्रांच्या माध्यमातून ट्वीटरवर श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, लर्सन एंड टूब्रो कंपनी, आईआईटीच्या इंजीनियर्साकडून राम मंदिर निर्माणासाठी मदत घेतली जाणार आहे. लोखंडाऐवजी तांब्याचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधानांनी भूमिपुजनाच्या वेळेस चांदीच्या वीटेचं पुजन केले होते. तसेच प्राजक्ताच्या फूलाचं रोपटं लावण्यात आले आहे. हिंदू पुराणातील कथांमध्ये समुद्रमंथनातून प्राजक्ताचं फूल पृथ्वीवर आल्याची अख्यायिका आहे.

 

News English Summary: The construction of Shri Ram Janmbhoomi Mandir has begun. Engineers are now testing the soil at the Mandir site. The construction work is expected to finish in 36-40 months. Iron won’t be used in the construction of the Mandir says Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra.

News English Title: Ayodhya Shri Ram Janmbhoomi Mandir construction begins iron wont be used in the construction of the temple News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x