22 November 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

रशियातील विरोधी पक्षातील नेते एलेक्सी यांच्यावर चहामधून विषप्रयोग | प्रकृती गंभीर

Russian President Vladimir Putin, opposition leader Alexei Navalny, Drinking poisoned tea, Airport

मॉस्को, २० ऑगस्ट : रशियाचे विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिनचे विरोधी एलेक्‍सी नवलॅनी यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की विमान प्रवासादरम्यान त्यांना कोणीतरी चहातून विष दिलं. नवलॅनी एका कामासाठी सायबेरियाला गेले होते आणि तेथून मॉस्कोला परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवलॅनी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे फ्लाइटमधून आपात्कालिन लँडिंग करावी लागली.

एलेक्सी यांचे प्रवक्त्या अशणाऱ्या कीरा यारम्यश यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एलेक्सी यांचा जीव धोक्यात असल्याचे कीरा यांनी म्हटलं आहे. एलेक्सी यांच्यावर विष प्रयोग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते कोमामध्ये गेले आहेत असंही कीरा यांनी ट्विट केलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम चहामधून विष देण्यात आल्याने ते वेगाने शरीरामध्ये पसरल्याची शक्यता आहे. पोलिसांची एक तुकडीही रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. कीरा यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्विटमध्ये “एलेक्सी यांना खूपच घातक विष देण्यात आलं आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत,” अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, कदाचित नवलनींना विष देण्याची घटना यावर्षी होणाऱ्या स्थानिक निवडणुकीशी संबंधित असावी. नवलनी पुतीन यांचे विरोधक आहे. व्यवसायाने वकील असणाऱ्या नवलनी यांनी भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा अभियान चालवले होते. त्यांनी नेहमी पुतीन विरोधी रॅली आयोजित केल्या होत्या. यामुळे त्यांना बरीच वर्षे तुरूंगात रहावे लागले होते असं किरा यांनी सांगितले.

 

News English Summary: The anti-corruption campaigner fell ill during a flight and the plane made an emergency landing in Omsk, Kira Yarmysh said, adding that they suspected something had been mixed into his tea. The Kremlin said that it wished Mr Navalny a “speedy recovery”. Mr Navalny, 44, has been a staunch critic of President Vladimir Putin.

News English Title: Russian President Vladimir Putin enemy and opposition leader Alexei Navalny fighting for life after drinking poisoned tea at airport News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Russia(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x