शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या वेळी भाजपाला पाझर फुटला नाही | अनिल गोटे
धुळे, २० ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची अथवा आत्महत्येच्या घटनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी खोचक टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
मी आपला साधा भोळा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तेवढ्याच जगाच्या मर्यादित प्रश्न उभे राहतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना आमच्या जिल्ह्यातील धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजप नेत्यांना पाझर फुटला नाही. धर्मा पाटिल यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी सुशांत सिंहच्या प्रकरणी आकाश पाताळ एकत्र करणाऱ्यांनी नेमके काय प्रयत्न केले होते? असा अत्यंत बाळबोध प्रश्न मला पडला आहे.
शेतकऱ्याने आपल्या कार्यालयात आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना आपण शोधून काढले का? की बिचाऱ्या शेतकर्यांच्या प्राणास काहीच किंमत नाही. कारण त्यांना आत्महत्या करण्याची पाळी आणायला भाग पाडणारे आपल्या मंत्री मंडळातील सहकारी होते म्हणून आपण डोळ्यावर भाजपने सोडलेल्या सांडाचे कातडे पांघरून घेतले होते का? आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यचे भांडवल करणे यालाच तर म्हणतात ना प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा?, असा प्रश्नही अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआय करणार सीबीआयची विशेष टीम मुंबई विमानतळावर पोहोचली आहे. दिल्ली-मुंबई एअर इंडिया फ्लाईटनं सीबीआय मुंबईत वांद्रे, दादर किंवा गोरेगावपैकी एका ठिकाणी जाणार सीबीआय टीमला क्वारंटाईन करणार नाही असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
#VIDEO – सुशांतसिंह राजपूत प्रकरण तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल | धक्काबुक्कीत प्रसार माध्यमांचे माईक सुद्धा खाली पडले.#SushantSinghRajput #CBI #Mumbai #Arrival pic.twitter.com/iSIK2n94vd
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) August 20, 2020
News English Summary: When Devendra Fadnavis was the Chief Minister and Home Minister, a farmer named Dharma Patil from our district had committed suicide by drinking poison in the Ministry. At that time, the BJP leaders did not burst. Who was responsible for Dharma Patil’s suicide?
News English Title: Why BJP leaders did not serious during farmer Dharma Patil former MLA Anil Gote criticism on Sushant Singh Case News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार