22 November 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

भारत सरकारकडून कोरोना लस खरेदी करण्याचा विचार | कोणाला प्राधान्य हाच मुद्दा

CoronaVirus, Corona vaccine

मुंबई, २१ ऑगस्ट: भारतासह जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यातच ऑगस्टमध्ये कोरोनानं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हर्ड इम्युनिटी आणि कोरोना लस हेच कोरोनाला रोखण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचं याबद्दलचं धोरण वेगवेगळं असणार आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशात नागरिकांना कोरोनावरील लस देणं अतिशय मोठं आव्हान असेल. त्यात बराच मोठा अवधी जाईल. त्यामुळे सर्वात आधी कोरोना लस कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. त्यात कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पालिकेतील कामगार आणि पोलिसांना प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाशी झुंज देणारी आघाडीची फळी सुरक्षित असणं गरजेचं असल्यानं त्यांना प्राधान्य देण्यात येऊ शकतं.

यासोबतच कोरोनाचा सर्वात धोका वृद्धांनादेखील प्राधान्य मिळू शकेल. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स तर होत नाहीत ना, हे विचारात घेतलं जाईल. यानंतर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या भागात लसीकरण करण्यात येईल. कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक असलेल्या भागांमधील नागरिकांना लस दिली जाईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करताना करोना लसीचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदीने सध्याच्या घडीला देशात एक नाही तर तीन करोना लसींची चाचणी सुरु असल्याचं सांगितलं होतं. भारतात सध्या तीन कंपन्या करोनावरील लसीवर काम करत आहेत. या कंपन्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पार पाडण्यासाठी बराच अवधी असून ती पार पडल्यानंतर लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे.

भारतातील त्या तीन कंपन्या कोणत्या ?

  • भारत बायोटेक आणि आयसीएमआर कोवॅक्सिन (Covaxin)नावाने लस तयार करत आहे. .
  • जायडस कॅडिला कंपनीकडून ZyCoV-D नावाने एक लस तयार होत आहे.
  • सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका मिळून कोविशिल्ड (AZD 1222) लसीवर काम करत आहेत.

 

News English Summary: Some of the side effects of the corona vaccine may or may not be considered. The corona will then be vaccinated in the most widespread area. Citizens in areas with the highest rates of corona infection will be vaccinated.

News English Title: CoronaVirus Once we have a Corona vaccine who will get the shots first News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x