22 November 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत माहिती

ICMR, Bharat Biotech, Covid Vaccine, Covaxin

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट : भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षा अखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतातील कोरोना लशीबाबत माहिती दिली आहे. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “जगभरात कोरोना लशीचं ट्रायल फास्ट ट्रॅक केलं जातं आहे. भारतातील लशींचं ट्रायल 2020 वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. 2021 च्या पहिल्या तिमाही लशीचा वापर करण्यासाठी आपण तयार असू शकतो”

आरोग्य मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोनावरील अनेक लसींची चाचणी वेगाने घेतली जात आहे. स्वदेशी लसींची चाचणी वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोनावरील लस बाजारात येण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची आधीच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करीत आहे. उर्वरित दोन लसी तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीतकमी एक महिना अधिक वेळ लागू शकेल. वर्षाच्या अखेरीस या लसी उपलब्ध होतील, अशी शक्यता डॉ. हर्षवर्धन यांनी वर्तविली आहे.

 

News English Summary: Health Minister Dr. Harsh Vardhan has given information about Corona vaccine in India. Dr. Harsh Vardhan said, “The trial of Corona vaccine is being fast-tracked all over the world. The vaccine trial in India is expected to be completed by the end of 2020. We can be ready to use the vaccine in the first quarter of 2021.”

News English Title: ICMR Bharat Biotech Covid Vaccine Covaxin Could Be Available By End Of 2020 Claims Health Minister Harsh Vardhan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x