बिहार निवडणूक अशी होणार | ऑनलाइन नामांकन, ग्लव्हज घालून मतदान

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट : कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्स नुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
Voters will be provided with gloves to press EVM button and COVID-19 patients in quarantine will be allowed to vote at the last hour of the polling day, according to broad guidelines issued by Election Commission for holding elections during COVID-19 pandemic
— Press Trust of India (@PTI_News) August 21, 2020
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून स्पष्ट केले की, यावेळी उमेदवार सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करू शकतील. देशातील निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच कुठलाही उमेदवार हा सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करतील. त्याशिवाय, विधानसभेच्या उमेदवारांचे नामांकनही ऑनलाइन भरता येईल.
दरम्यान, निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीसाठी होणाऱ्या घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असेल. तसेच केंद्रीय गृहमंत्रालाने दिलेल्या सूचनांनुसारच सभा आणि रोड शोंना परवानगी देण्यात येईल. तसेच निडणुकीदरम्यान, कोरोना संकट विचारात घेऊन सावधगिरी बाळगण्याची सूचना निवडणुक आयोगाने केली आहे. निवडणूक काळात फेस मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ग्लव्हज, पीपीई किट्सचा वापर निवडणूक प्रक्रियेदरम्यान केला जाईल. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालक करण्यात येईल
कोरोना विषाणूच्या फैलावाची भीती विचारात घेऊन व्होटर रजिस्टर असाइन करण्यासाठी सर्व मतदारांना ग्लव्स देण्यात येतील. मतदारांना ईव्हीएम मशीनमध्ये मतदान करण्यापूर्वी गरज पडल्यावर ओळख पटवण्यासाठी फेसमास्क हटवावा लागेल.
News English Summary: In view of the upcoming Bihar Assembly polls, the Election Commission Friday issued fresh guidelines for conduct of elections during the Covid-19 pandemic. After considering suggestions made by political parties and chief electoral officers of states and union territories, the poll watchdog said that only a group of five people can campaign door-to-door. It also restricted candidate convoy for roadshows to five vehicles, among other measures.
News English Title: Voting guidelines election commission of India issues guidelines for general elections by elections during Covid 19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA