29 April 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

कम बॅक राहुलजी | महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं राहुल गांधींना पत्र

Come back Rahul Gandhi, Minster Balasaheb Thorat

मुंबई, २३ ऑगस्ट: काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.

अध्यक्ष म्हणून आता मला कायम राहायचं नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष शोधा, असं सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपद सोडलं, तर पुढे पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्व बदलाची चर्चा सुरु असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य असलेले बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींना यासाठी आवाहन केलं आहे. कम बॅक राहुलजी अशी साद त्यांनी या पत्रातून घातली आहे. फक्त काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला तुमची गरज असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.

सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते तयार झाली आहेत.

 

News English Summary: Maharashtra Congress state president and minister Balasaheb Thorat has written a letter to Rahul Gandhi to lead the party. Balasaheb Thorat, an executive member of the All India Congress, has appealed to Rahul Gandhi for this. Come back Rahulji, he has called for in this letter.

News English Title: Come back Rahulji Minster Balasaheb Thorat letter to MP Rahul Gandhi to lead the party News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BalasahebThorat(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या