22 April 2025 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT
x

स्वबळावर नाही | भाजप मित्र पक्षांसोबत लढणार बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, BJP JDU LJP Alliance, CM Nitish Kumar, J P Nadda

पटणा, २४ ऑगस्ट : अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीतही हाच फंडा वापरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी घोषणा करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जे पी नड्डा यांनी जाहीर केले की, भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेन. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक भाजप नीतीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, राम विलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी या मित्रपक्षांसोबत लढणार आहे.

दरम्यान, जनता दल (यु) आणि लोकजनशक्ती पार्टी हे जाहीररीत्या एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीने पार पडलेल्या बिहार भाजप कार्यसमितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, जेव्हा भाजप, जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी एकत्र आली होती तेव्हा बिहारमध्ये राजग विजयी झाली होती. आताही भाजप, जनता दल (यु) आणि लोजपा मिळून निवडणूक लढवतील आणि विजय मिळवतील.

बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला. विरोधी पक्षांकडे कोणतीही तत्त्वे नाहीत, दृष्टिकोनही नाही. तसेच जनतेची सेवा करण्याची भावना विरोधकांच्या ठायी नाही. आम्ही निश्चित विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बिहार विधानसभेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानुसार, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते. म्हणजे, जनता युनायडेट दल 110, भाजपा 100 आणि लोकजनशक्ती पार्टी 33 जागांवर आपले उमेदवार निश्चित उभे करणार आहे. याबाबत अद्याप घोषणा केली नाही, पण लवकरच जागावाटपांचा फॉर्म्युला ठरल्याचे घोषणा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेला जदयु बिहारच्या राजकारणात मोठा भाऊ आहे. यंदाही मोठ्या भावाची जागा बिहारलाच मिळणार आहे.

 

News English Summary: BJP national president J. P. Nadda put an end to all these discussions by announcing on Sunday. JP Nadda announced that the Bharatiya Janata Party will fight the Bihar Assembly Election 2020 with its allies. Therefore, it is clear that this election will be contested by BJP’s allies Nitish Kumar’s Janata Dal United (JDU), Ram Vilas Paswan’s Lok Janshakti Party (LJP).

News English Title: Bihar Assembly Election 2020 BJP JDU LJP fight together under leadership of CM Nitish Kumar says BJP National President J P Nadda News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या