19 April 2025 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

मुंबई बाहेरील क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते | तयारीत रहावे लागेल - मुख्यमंत्री

MMR Area, Corona Virus, CM Uddhav Thackeray

ठाणे, २४ ऑगस्ट : जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरु झाले आहे. त्यानूसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणो शक्य नाही, किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोर्पयत त्या सुरु केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

गणपती उत्सव सुरु झाला आहे, दिड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न झाले. परंतु आधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार, विसजर्न कसे होणार, पंरतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वाना धन्यवाद देतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई आणि मुंबईला जोडून एमएमआरडी क्षेत्रत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वानी अंत्यत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला करायला सुरवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झालेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाईगडबड केली आहे. परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितल.

“मुंबई महानगर क्षेत्रात (मुंबई बाहेर) करोनाची दुसरी लाट येऊ शकते, त्यासाठी तयारीत रहावे लागेल” असा सूर ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या करोना संसर्गाच्या आढावा बैठकीत व्यक्त झाला. या बैठकीत करोना नियंत्रणासाठी वापरण्यात आलेला मुंब्रा-धारावी पॅटर्न इतर शहरात वापरण्याविषयी चर्चा झाली.

ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील करोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, करोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाउननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू हे करत असताना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे.

 

News English Summary: A second wave of corona may occur in the Mumbai metropolitan area (outside Mumbai), for which we have to be prepared, ”he said at a review meeting of corona outbreaks held in Thane under the chairmanship of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title:  Another Wave Of Corona Could Come In MMR Be Prepared The Tone Of The Review Meeting News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या