22 April 2025 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सीबीआय'कडून मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स

Sushant Singh Rajput Suicide, CBI, summons Mumbai police officers

मुंबई, २५ ऑगस्ट : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने आता यापूर्वी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीकडे नजर वळविली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. त्यांनी केलेला तपास, त्यातील संथगती आणि त्रुटी आदीबाबत त्यांच्याकडे बुधवारी सखोल विचारणा केली जाईल,अशी माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाली आहे.

दरम्यान, विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या गेस्ट हाऊस येथे डीआरएच्या संदीप श्रीधर व सुशांतच्या परिचयातील तिघांना चौकशीसाठी केली. ईडीकडून मिळालेला दस्ताऐवज, सुशांतचे बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल सविस्तर तपशील सीएकडून माहिती करून घेतला.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करणार आहेत. ते ड्रग अॅंगलवरुन या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी आज एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने NCB यांना पत्र लिहिले आहे. सुशांतशी संबंधित काही लोक ड्रग्स घेत होते. काही जणं ड्रग्स डिलरशीही संपर्कात होते. एनसीबी याचा तपास सुरू करीत आहेत.

 

News English Summary: A special CBI team has now turned its attention to the Mumbai Police’s probe into actor Sushant Singh Rajput’s suicide. Inspector Bhushan Belnekar and Sub-Inspector Vaibhav Jagtap, who are investigating the case at Bandra Police Station, have been summoned for questioning on Tuesday.

News English Title: Sushant Singh Rajput Suicide CBI summons Mumbai police officers who are involved in investigation of Sushant Singh Rajput suicide case News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या