29 April 2025 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

NEET-JEE परीक्षा संदर्भात ७ राज्य सुप्रीम कोर्टात जाणार, सोनिया गांधींच्या बैठकीत निर्णय

NEET Exam, JEE Exam, Sonia Gandhi, Mamta Banerjee, CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.

सोनिया गांधींनी बैठकीत सर्वप्रथम जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सध्या नीट-जेईई परीक्षा घेणे सुरक्षित नाही. जर केंद्र सरकार प्रयत्न करत नसेल तर सर्व राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी.

सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कोरोनासह विविध विषयांवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगलंच लढत आहात, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी केलेल्या कौतुकाचे आभार मानत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचं की त्यांना घाबरून राहायचं हे आधी ठरवलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी या बैठिकित मांडले.

“घाबरायचं आहे की लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. अन्यथा आपण रोज भेटत राहू आणि अशाच चर्चा करत राहू, जर आपल्याला लढायचं असेल तर मग ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.

केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “ते विरोधी पक्षात आहेत किंवा ते इतर पक्षांबद्दल वाईट विचार करता असं नाही. पण तेदेखील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत”. “आपले देखील काही हक्क आहेत. आज सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातात आहे. पण मग राज्य सरकारांचा काय उपयोग? एकच व्यक्ती देश चालवणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का ? हे होणार नाही. जर आपण राज्यघटनेला मानणार नसू तर मग लोकशाही कुठे आहे?,” असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले.

 

News English Summary: Sonia Gandhi was the first to raise the issue of GST in the meeting. Mamata Banerjee later said that it is not safe to take the NEET-JEE exam at present. If the Center does not make an effort, all the state governments should ask the Supreme Court to postpone the examination.

News English Title: Seven states to go against NEET JEE exam decide in Sonia Gandhi meeting News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या