22 November 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राष्ट्रवादीकडून गळचेपी | शिवसेना खा. संजय जाधव यांचा राजीनामा | नार्वेकरांची शिष्टाई

Shivsena MP Sanjay Jadhav, Resignation, Chief Minister Uddhav Thackeray, Milind Narvekar

मुंबई, २६ ऑगस्ट : राज्यात महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र या तीनही पक्षांमध्ये राष्ट्रवादीचाच सर्वात जास्त दबदबा असल्याची कायम चर्चा असते. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यामुळे त्याची चर्चा आता जोरात सुरु झालीय.जाधव यांच्या परभणी मतदार संघात येणाऱ्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ असावं असा प्रयत्न जाधव करत होते. 8 ते 10 महिने प्रयत्न केली मात्र शिवसेनेचं नाही तर राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं गेलं.

जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या मंडळावर घेतलं गेलं. त्यामुळे शिवसैनिकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे अशी खंत जाधव यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांनी राजीनामापत्रात आपल्या व्यथेला मोकळी वाट करून दिल्याने शिवसेनेतही अस्वस्थता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. असंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई करत या वादातून तोडगा काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई करत काल मध्यरात्री एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. या चर्चेतून वादावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे.

आज सकाळी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याशीही मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी सात आणि दहा वाजता फोनवरून सविस्तर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता संजय जाधव यांना निरोपही दिला असल्याची माहीती मिळतेय. संजय जाधव यांना मुख्यमंत्र्यांनी उद्या भेटीसाठी बोलावलं आहे.

 

News English Summary: According to sources, Shiv Sena secretary Milind Narvekar had a polite discussion with NCP state president Jayant Patil at 1 am yesterday. It is learned that the dispute was resolved through this discussion.

News English Title: Shivsena MP Sanjay Jadhav give resignation to Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x