22 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

GST थकबाकी अशीच वाढत गेल्यास २ वर्षात ती एक लाख कोटींवर जाईल - अजित पवार

Deputy CM Ajit Pawar, Finance Minister Nirmala Sitaraman, GST Meeting

नवी दिल्ली, २७ ऑगस्ट : वस्तू आणि सेवा कर काऊन्सिंलची ४१ वी बैठक आज होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडेल. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि केंद्र सरकार व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वच राज्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात जीएसटीची भरपाई कशी करता येईल, हा बैठकीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.

रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस संकटामुळे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यात राज्यांना नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. म्हणून या बैठकीत राज्यांना नुकसान भरपाई कशी द्यावी यावर विचार होऊ शकतो.

दरम्यान, वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ४१ व्या जीएसटी परिषदेत अजित पवार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रानंच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा आणि संकटातून बाहेर काढावं अशी मागणी केली.

“जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणं, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्र सरकारने स्विकारली असल्यानं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करावा,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Maharashtra is in arrears of Rs 22,534 crore from the Center for compensation in goods and services tax by July 2020. If this amount continues to rise, it will go up to Rs 1 lakh crore in two years, said Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar.

News English Title: Maharashtra Deputy CM Ajit Pawar Finance Minister Nirmala Sitaraman GST Meeting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x