22 November 2024 6:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश | मनसे गुहागर तालुका सचिव पोलिसांच्या ताब्यात

Exposing fake e pass, MNS office Rakesh Surve, Guhagar

नाशिक, २७ ऑगस्ट : ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट 1च्या पथकाने बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवाशी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे उर्फ कृष्णा यास आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष बाब म्हणजे हा सुर्वे मनसेचा गुहागर तालुका सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असेल याबाबतही विविध चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

तंत्रिकविश्लेषणाच्या सहाय्याने नाशिकच्या क्राईमब्रँच युनिट-1च्या पथकाने ध्वनिफीतमधील आवाजाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. त्यावरून तपासाचे धागेदोरे थेट रत्नागिरीच्या गुहागरपासून मुंबईच्या डोंबिवलीपर्यंत जाऊन पोहोचले. संशयित गुहागरला असल्याचे निष्पन्न होताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बलराम पालकर, दिलीप मोंढे, विशाल देवरे यांचे पथक रवाना केले.

व्हाट्सअँप’वर व्हायरल ध्वनीफितमधील आवाज असलेल्या मोबाईलधारक संशयित मनसेचा गुहागर तालुका सचिव असलेल्या सुर्वे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत 15 प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी 2 हजार रुपये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ईपास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पालकर करीत आहेत.

 

News English Summary: A few days back, a MNS official in Mumbai had demanded to find the fake e-pass issuers. A team of Unit 1 of Nashik Crime Branch has arrested Rakesh Sadanand Surve alias Krishna, a resident of Guhagar in Ratnagiri district, on suspicion of selling fake e-passes on the basis of a viral audio recording.

News English Title: Exposing fake e pass sales in the state MNS office Rakesh Surve arrested by police in Guhagar News Latest updates.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x