29 April 2025 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

UGC, final year exams, Supreme Court of India

नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.

30 सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढं ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असं कोर्टानं म्हटलंय. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असंही कोर्टानं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती अशोक बूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना यूजीसीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं आहे. जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करु शकतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

राज्य सरकारची भूमिका काय?
राज्यातील 14 सार्वजनिक विद्यापीठात आत्ता 7 लाख 34 हजार 516 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणारे यात 2 लाख 83 हजार 937 विद्यार्थी आहेत. राज्य सरकारनं पदवीच्या मुलांच्या परीक्षा होणार नाहीत, असं म्हटलंय पण यूजीसी परीक्षांवर ठाम आहे. 30 सप्टेबरच्या आत परीक्षा घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत. त्याविरोधात महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी, न्या. एम.आर.शाह यांनी हा फैसला सुनावला.

 

News English Summary: The wait for lakhs of final year students has come to an end today. The Supreme Court has announced its verdict on the pleas challenging the decision of UGC asking universities and colleges to conduct exams by September 30 amid the coronavirus pandemic. A bench headed by Justice Ashok Bhushan, which had reserved its verdict on August 18, pronounced the judgment at 10.30 am.

News English Title: UGC final year exams SC final verdict exams mandatory says Supreme Court of India News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या