22 November 2024 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

...ती ऍक्ट ऑफ मास्टर ऍक्टर | अर्थमंत्र्यांच्या टिपणीवर समाज माध्यमांवर हास्य जत्रा

Act of master actor, Congress leader Jairam Ramesh, FM Nirmala Sitharaman

नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या.

सीतारामन यांना ‘देवाची करणी’ विधानावरून लक्ष्य करताना अनेकांनी भाजपचेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटचा आधार घेतला आहे. त्यामुळे वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्विट अचानक चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी केलं होतं. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. कोरोना देवाची करणी आणि पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार यांचा संबंध सोशल मीडियावर अनेकांनी जोडला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सुद्धा जीडीपी’ची आकडेवारी क्रमवार सदर करत मोदींना जबरदस्त टोला लगावला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विधानाची खिल्ली उडविताना त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “निर्मला सीतारामनजी ही ‘ऍक्ट ऑफ गॉड’ होती कि ‘ऍक्ट ऑफ मास्टर ऍक्टर’.

 

News English Summary: Finance minister Nirmala Sitharaman on Thursday said that the economy is facing an extraordinary ‘act of God’ in form of the coronavirus pandemic which may result in contraction in India’s growth for the current fiscal.

News English Title: Was this act of master actor says congress leader Jairam Ramesh over FM Nirmala Sitharaman Statement News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x