22 November 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

कोरोनाचा कहर | आकडेवारीत उच्चांक गाठण्यात अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट : देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 79,000 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात देशात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळेच रुग्णांची संख्याही वाढत आहे. आयसीएमआरच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ४ कोटी १४ लाख ६१ हजार ६३६ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर २९ ऑगस्ट रोजी दहा लाख ५५ हजार २७ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ICMR कडून मिळेल्या माहितीनुसार भारतात शनिवारी १०,५५,०२७ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८ हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या देशात ७ लाख ६५ हजार ३०२ लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकणू रुग्णांची संख्या ७,६४,२८१ अतकी झाली आहे.

 

News English Summary: India on Sunday recorded 78,761 cases of the coronavirus disease in the last 24 hours, according to the Union health ministry data. This pushed the nationwide tally to 3,542,733. The number of active cases in the country stand at 7,65,302, while the death toll has reached 63,498.

News English Title: India Covid19 Case Tally Crosses 35 Lakh Mark With A Spike Of 78761 New Cases 948 Deaths In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x