22 November 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

तरीही संदीप सिंहच्या कंपनीशी गुजरात सरकारने १७७ कोटीचा करार केला? - सचिन सावंत

Gujarat state government, signed MoU, Sandeep Singh, PM Narendra Modi biopic

मुंबई, ३० ऑगस्ट : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला संदीप सिंह याच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांची आणखी काही माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी रविवारी ट्विट करून यासंदर्भात भाजपवर नवे आरोप केले. संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून भाजपवर टीका करणाऱ्या ट्वीटचे सत्र सुरू आहे. आज देखील त्यांनी संदीप सिंहच्या मुद्द्यावरून गुजरात भाजपवर टिका केली आहे.

‘भाजपच्या मर्जीतील मुलगा संदीप सिंह यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहारात 2017 साली 66 लाखाचे नुकसान झाले होते, 2018 साली साली 61 लाखाचा नफा, तर पुन्हा 2019 मध्ये 4 लाखाचे नुकसान झाले होते. 219 मध्ये गुजरात सीएम रूपानी यांनी संदीप सिंहसह 177 कोटींचा करार केला. हा पैसा कुठून येत होता?’, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

त्याला लागूनच सावंत यांनी दुसरे ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मोदीजींचा बायोपिक करण्यास सहमती दर्शविण्याकरिता हा सामंजस्य करार होता? हे “टोकन अ‍ॅडव्हान्स” होते का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी संदीप सिंह याची निवड नेमक्या कोणत्या कारणासाठी केली?’ अशाप्रकारे सचिन सावंत यांनी प्रश्नांची सरबत्ती करत भाजप नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

 

News English Summary: Bollywood actor Sushant Singh Rajput’s death in the wake of the suspicion of Sandeep Singh’s relationship with the BJP has come to light. Congress leader Sachin Sawant on Sunday tweeted new allegations against the BJP.

News English Title: Is Gujarat state government signed MoU with Sandeep Singh in 2019 to for agreeing to do the PM Narendra Modi biopic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x