22 November 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

राहुल गांधींना रोखण्याची सक्रियता काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करणारी ठरेल - संजय राऊत

Stopping Rahul Gandhi, Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, ३० ऑगस्ट : काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले.

संजय राऊत लेखात म्हणतात, काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने चांगलाच राजकीय धुराळा उडाला. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमी होत असतात. काँग्रेस नेत्यांची ही मागणी योग्यच असली तरी राहुल गांधींना रोखण्याचा प्रकारही सुरु असल्याचे राऊत यांनी सूचकपणे म्हटले आहे. याच्या परिणामावर भाष्य करताना राहुल गांधींना रोखण्याची सक्रियता काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करणारी ठरेल असे महत्वाचे विधानही त्यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षातून फुटूनच ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःचे पक्ष तयार केले. त्यामुळे काँग्रेसचा सारखा पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात टिकला पाहिजे. समोर प्रबळ विरोधी पक्ष असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काम करण्याचा उत्साह येतो. राज्यात आमच्या समोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे, ज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News English Summary: Although the Congress leaders’ demand is justified, Raut has hinted that there is a way to stop Rahul Gandhi. Commenting on the outcome, he also said that any attempt to stop Rahul Gandhi would destroy the very existence of the Congress.

News English Title: Stopping Rahul Gandhi will Lead To Extinction Of Party Says Shivsena MP Sanjay Raut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x