18 April 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार
x

माहितीप्रमाणे CBI'कडे ८ जूनचे मोबाइल टॉवर लोकेशन समोर आले आहेत | अब तो गयो

BJP MLA Nitesh Rane, Sushant Singh Rajput, CBI inquiry

मुंबई, १ सप्टेंबर : सीबीआयकडून मंगळवारी रियाची चौकशी होणार नसल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज म्हणजेच मंगळवरी रिया सीबीआय चौकशीसाठी जाणार नाही. तर, याऐवजी रियाची आई, वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलवलं आहे. ज्यामुळे रियाचे आई-वडील DRDO गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी हजर झाले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मंगळवारी एकूण आठ जणांची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. यामध्ये सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, सुशांतचे नोकर नीरज सिंग आणि केशव बचनेर, मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांचा समावेश आहे. शिवाय अभिनेता सुवेध लोहिया DRDO ला दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. याव्यतिरिक्त सुशांतची बहीण मितुची दुसऱ्या ठिकाणी चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच याला वेगळं वळण मिळालं ते म्हणजे ड्रग्ज कनेक्शनमुळे. याच प्रकरणी रिया आणि गौरव आर्याच्या व्हॉट्सअप चॅटमुळे गौरव आर्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही ईडीने गौरव आर्याला चौकशीसाठी बोलावलं आहे. ड्रग्जबाबतची सगळी माहिती गौरव आर्याकडून ईडी घेत आहे.

मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या ट्विटने पुन्हा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. सध्या सीबीआय’ने जोरदार चौकशी सत्र सुरु केलं असून त्यात मोबाईल संवादबाबत अधिक माहिती घेणं सुरु आहे. नेमकं त्याच बाबत आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या माहितीप्रमाणे सीबीआय’कडे ८ जूनचे संवाद मोबाइल टॉवर लोकेशनवरून समोर आले आहेत आणि त्यामुळे मुंबई पोलिसांवर नक्की दबाव का होता आणि कोणाला महाविकास आघाडी सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत होतं! 8 जून हीच किल्ली आहे!…अब तो नक्कीच गयो !”.

 

News English Summary: According to my source.. Mobile tower location of June 8 with the CBI has revealed why there is so much pressure on Mumbai police n who is the Maha Gov trying to save! 8th June is the key! Ab toh definitely giyo twit by BJP MLA Nitesh Rane News latest Updates.

News English Title: BJP MLA Nitesh Rane twit on Sushant Singh Rajput case CBI inquiry News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या