21 November 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

माध्यमांकडून फेक न्यूज | चिनी सैनिकांच्या कबरी १९६२ मधील | जोडली गलवान खोऱ्याशी

India Today group, times now, PLA cemetery as graves, killed in Galwan, Fake News, fact Check

नवी दिल्ली, १ सप्टेंबर : गलवान खोऱ्यात १५ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या भीषण सामोरामुळे २० भारतीय सैन्य जवान ठार झाले. दुसरीकडे, चिनच्या बाजूने नेमकं काय नुकसान झालं याची कोणतीही अधिकृत माहिती चीन सरकारकडून देण्यात आली नव्हती. केवळ निरनिराळ्या बाजूनी अंदाज बांधण्यात आले होते, ज्याला कोणताही पुरावा नव्हता. भारतीय माध्यमांनी देखील केवळ अंदाजच मांडले होते. मात्र आता भारतीय माध्यमांना याच विषयाला अनुसरून चुकीचे फोटो प्रसिद्ध करून फेक न्युज पसरविण्यास सुरुवात केली आहे.

३१ ऑगस्ट रोजी, आज तकने ‘40’ पीएलए सैनिक हे सीमापार चकमकीत ठार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी फेक फोटो प्रसिद्ध करून न्यूज सुरु केल्या आहेत. अँकर रोहित सरदाना यांनी ट्विट करत दावा केला की, “आम्ही तुम्हाला चिनी सैनिकांच्या कबरीची छायाचित्रे दाखवत आहोत. गलवान चकमकीत ठार झालेल्या चिनी सैनिकांचा पुरावा देशातील अनेक लोकांना हवा होता. याचा पुरावा तुमच्या दूरचित्रवाणीवरील पडद्यावर आहे… भारताबरोबर झालेल्या चकमकीत 40 हून अधिक चिनी सैनिक मरण पावले आणि चिनी सैनिकांनी त्यांच्या कबरींचा कसा आदर केला हे आपण पाहू शकता, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आज तकच्या इंग्रजी वाहिनीने म्हणजे इंडिया टुडेनेसुद्धा असेच व्हिज्युअल प्रसारित केले. त्यात दोन लाल बाण विशिष्ट क्षेत्राकडे लक्ष वेधून “नवीन कबरे” असल्याचा दावा केला आहे. अँकर नबीला जमाल यांनी दावा केला की, “गलवानच्या चकमकीत मरण पावलेला चीनी सैनिकांचं स्मारक उभारलं”. पीएलएच्या सैनिकांकडून त्या कबरींना भेटी दिल्या जाणाऱ्या त्या चित्रांनुसार…गॅलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याचं मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा पुरावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.”

टाइम्स नाऊने दुसरीकडे दावा केला आहे की, 156 पीएलएच्या थडग्यांवरील फोटोंनी 15 जूनच्या गॅलवानमध्ये झालेल्या चकमकीत चिनी लोकांचा बळी गेला आहे. चॅनलने पुढे ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी गल्वान ग्रिट बद्दल योग्य होते, पण चीन समर्थक लॉबीने भारतावर शंका घेतली होती.

 

NewsX आणि एबीपी न्यूजने सुद्धा यासंदर्भात कार्यक्रम प्रसारित करून दावा केला की गॅलवानमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू पावलेल्या चिनी सैनिकांच्या ३० हून अधिक कबर सापडल्या.

फॅक्ट चेक:
१९६२’च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या पीएलए सैनिकांच्या थडग्यात असलेल्या कंगक्सीवा शहरातील चिनी सैन्याच्या कब्रस्थानची ही छायाचित्रे आहेत. इंडिया टुडेने २०११ मधील गुगल अर्थ फोटो गलवानशी जोडून खोटं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्मशानभूमीचे छायाचित्र चीनी सर्च इंजिन बैदु वर प्राप्त झाले. वास्तविक ते २०११ चे आहेत आणि डाव्या बाजूला स्पष्टपणे ४३ थडगे दिसत आहेत. शेवटच्या ओळीत (लाल रंगात चिन्हांकित) फक्त एक कबर आहे.

24 ऑगस्ट रोजी, चिनी सैन्याने मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट वेइबो’वर युद्ध स्मारकास भेट दिल्याचा व्हिडिओ सार्वजनिक केला होता.

 

News English Summary: The deadly face-off between Indian and Chinese soldiers in Galwan valley on June 15 led to the deaths of 20 Indian army men. The casualties suffered on the Chinese side, on the other hand, has been left to much speculation by the Chinese government thus giving rise to misinformation.

News English Title: India Today group times now air old images of PLA cemetery as graves of Chinese killed in Galwan News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x