22 November 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

पदवीधर आहात | रेल्वेत ३५ हजार २०८ पदांसाठी भरती | ऑनलाईन परीक्षा होणार

Railway Recruitment Board, Bank Recruitment, MPSC, UPSC, Staff Selection

नवी दिल्ली, २ सप्टेंबर : कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता(DA), घरभाडे(HRA) परिवहन भत्ता(Transport) पेन्शन योजना(Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.(Indian Railway Recruitment 2020).

आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.

आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

वयोमर्यादा: सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे; ओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे.

 

News English Summary: Corona is comforting news for the unemployed in times of crisis. Employment opportunities are available for young people who want government jobs. RRB NTPC 2020 recruitment process has been started. Under this, about 35 thousand 208 vacancies will be filled in the railways.

News English Title: Railway Recruitment for 35000 seats of Indian Railways Apply and get a government job News latest Updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x