22 November 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

राज्य पोलिस दलात १५,५९१ कोरोना बाधित | आजपर्यंत १५८ पोलिसांचा मृत्यू

Maharashtra Police, Covid19, Corona Virus

मुंबई, २ सप्टेंबर : देशात करोनाचा शिरकाव सर्वात आधी केरळमध्ये झाला. केरळमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सुरूवातीच्या काही दिवसांनंतर राज्यात करोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत गेली. सध्या देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत ६६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील २५ हजाराच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटात नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि कायद्याची पायमल्ली होणार नाही यासाठी सतर्क असलेले पोलिसही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण 15,591 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 12,640 पोलिसांनी कोरोना संसर्गावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर 158 पोलिसांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान सध्या 2793 कोरोना बाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना व्हायरस संसर्गाच्या संकट काळात पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष दिले. अनेकदा कर्तव्यापलिकडे जात गरजूंची मदत केली. दरम्यान पोलिसांच्या या मेहनतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

News English Summary: A total of 15,591 COVID19 cases reported so far in Maharashtra Police, including 12,640 recovered and 158 deaths. Active cases in the force stand at 2793: Maharashtra Police.

News English Title: Coronavirus in Maharashtra police 15591 covid19 cases reported so far including 12640 recovered and 158 deaths News Latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x