5 November 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
x

विरोधक संसदेत मोदी सरकारला प्रश्न विचारू शकणार नाहीत | शशी थरूर यांचं भाकीत खरं ठरलं

Parliament Mansoon Session, Question Hour, Modi Government, Opposition Criticize

नवी दिल्ली, २ सप्टेंबर : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. परंतु पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला आहे. तसंच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त शून्यप्रहरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी “चार महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो देशातील ताकदवान नेते महामारीचा वापर लोकशाही संपवण्यासाठी करतील,” असं म्हणत सरकारच्या या निर्णयावर टीका केली.

काय म्हटलं होतं शशी थरूर यांनी:
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीदेखील यावरून सरकारवर टीका केली आहे. “देशातील ताकदवान नेते माहामारीचा वापर लोकशाही संपवण्यास करू शकतात हे मी चार महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. संसदेच्या नोटीफिकेशननुसार यावेळी प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही हेच दिसत आहे. आमच्या सुरक्षित ठेवण्याच्या नावावर हे किती योग्य आहे,” असं शशी थरूर म्हणाले. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणं हे ऑक्सिजनप्रमाणे आहे. परंतु सरकार संसदेला नोटीस बोर्डप्रमाणे बनवू इच्छित आहे. तसंच त्यांना आपलं बहुमत रबर स्टॅम्पप्रमाणे बनवायचं असल्याचंही ते म्हणाले.

 

News English Summary: The opposition leaders have slammed the BJP-led central government and accused it of stifling dissent and democracy after a notification said there will be no Question Hour during the Monsoon Session of the Parliament. Also, private members’ bills will not be taken up in the upcoming monsoon session of Parliament, while the Zero Hour will be restricted, notifications issued by Lok Sabha and Rajya Sabha secretariats said.

News English Title: Parliament Mansoon Session Question Hour Modi Government Opposition Criticize Coronavirus Pandemic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x