22 April 2025 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

विधानसभा प्रचारात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन जनतेला आवडलं की नाही - एकनाथ खडसे

BJP leader Eknath Khadse, Devendra Fadnavis

जळगाव, २ सप्टेंबर : भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात एकाकी पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारी समितीमध्ये देखील त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मागील काही काळात त्यांना भाजपच्या राज्यांसंबंधित निर्णयात सामील देखील करून घेतलं जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रात जस मोदी आणि अमित शहा यांचा आवाज चालतो, तसा राज्यात फडणवीस यांचा आवाज चालतो असं भाजपच्या अंतर्गत गोटात देखील छुप्या आवाजात मान्य केलं जातं.

दरम्यान, भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता हल्ला चढवला आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आपल्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. त्यावरूनही खडसेंनी फडणवीस यांना टोला लगावला. ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत खडसेंनी फडणवीस यांना नाव न घेता लक्ष्य केलं.

 

News English Summary: BJP leader and former minister Eknath Khadse has once again attacked party leaders without naming them. Leaders who emerged in the party ten-fifteen years ago are now teaching us common sense, said Khadse without targeting Leader of the Opposition Devendra Fadnavis.

News English Title: BJP leader Eknath Khadse hits out at his own party leader News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या