महापौरांच्या मुलाला व जावयाला कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्ट | भाजप अधिवेशनात पर्दाफाश करणार
मुंबई, ३ सप्टेंबर : अभिनेता दिनो मोर्या यांचे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे संबंध जगजाहीर आहेत. मोर्याशी संबंधित लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात व्यस्त आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या वतीने केला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात १४२ कंपन्या सॅनिटायझर बनवत होत्या. यात पैसा आहे हे लक्षात येताच कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ११० नवीन कंपन्यांचा जन्म झाला. त्यातील १६ कंपन्यांवर एफडीएने कारवाई करून छापे टाकले होते. त्यातल्या ८ कंपन्या बोगस निघाल्या. एफडीएला आपण पत्र लिहिल्यानंतर सुध्दा एकाही कंपनीची चौकशी केली गेली नाही. सरकारने २५२ कंपन्यांची चौकशी करायला हवी होती अशी खळबळजनक माहिती देताना मुंबई महापालिकेत सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.
एका एनजीओने सगळ्या सॅनिटायजरचे नमुने घेतले. त्यांच्या चाचणीमध्ये ४८ उत्पादने दोषी आढळली. मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढून ही सगळी माहिती जाहीर करावी. आम्ही या प्रकरणाची पोलिस आणि सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असेही शेलार म्हणाले.
तत्पूर्वी, भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत. वरळीच्या त्याच पत्त्यावर ८ आणखी संदिग्ध कंपन्यांनी नोंदणी केली जिथे महापौर आणि सन्स किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (किश म्हणजे किशोरी) नोंदणीकृत आहे, ज्यांना बीएमसी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे देखील तक्रार दाखल केली आहे.
8 more Dubious Companies registered on same address of Worli where Mayor & Son’s Kish Corporate Services India Pvt Ltd (Kish means Kishori) is registered, which got BMC Contract.
I filed complaint with Maharashtra Govt on Propriety & Financial Interest, Transparency, Disclosure pic.twitter.com/vmAF83H8Ul
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 1, 2020
मुंबई त्याच पत्त्यावर ८ कंपन्या रजिस्टर | मिळत आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट#BMC @KiritSomaiya @KishoriPednekar @SandeepDadarMNS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/Quf7BFd4jW
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 1, 2020
News English Summary: Mumbai mayor is busy giving covid center to his son and Javaya, all these issues will be exposed on behalf of BJP in the convention, said BJP leader and former school education minister Adv. Ashish Shelar has done. He has made these serious allegations in an interview given to a Marathi newspaper.
News English Title: CoronaVirus one family involved in sanitizer scam alleges BJP MLA Ashish Shelar Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS