ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा | घरी बसून परीक्षा देण्यास मंजुरी

मुंबई, ३ सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात आता विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता कायम असतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (गुरुवार, 3 सप्टेंबर 2020) महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचा अहवाल प्राप्त होताच त्यावर विचार केला जाईल. आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी शासन, प्रशासन सावध भुमिका घेताना दिसत आहेत.
“घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
आज परीक्षांच्या तारख्या अंदाजे स्वरुपात जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 15 ते 30 सप्टेंबर प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षाचे नियोजन आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठांकडून होईल. विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली असून सोप्या पद्धतीनं परीक्षा होतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी केल्याचे सामंत यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. ऑनलाइन परीक्षांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाचीच असेल, असेही सामंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
News English Summary: Exam dates have been announced today in approximate format. Accordingly, practical examinations may be held from 15 to 30 September. The main exam is scheduled for October. The universities will try to get the results by October 31. Minister Uday Samant has said that the governor has sanctioned the examinations for the students sitting at home and the examinations will be conducted in a simple manner.
News English Title: Maharashtra Higher And Technical Education Minister Uday Samant On Final Year Exams Marathi News LIVE latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK