29 April 2025 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
x

मोदी सरकारचं सत्य | तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय | मित्रांना पुढे घेऊन जायचंय - राहुल गांधी

Congress Leader Rahul Gandhi, Modi government National policy, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ५ सप्टेंबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या एकूण धोरणांवरच राहुल गांधी यांनी हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम खाजगीकरण, कोविड केवळ एक कारण आहे, सरकारी कार्यालय कर्मचारी मुक्त करायची आहेत, तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय आणि मित्रांना पुढे घेऊन जायचंय, असा शाब्दिक प्रहार राहुल गांधींनी केला आहे.

तत्पूर्वी, मोदी सरकारने नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्यांसह एकूण ५० थकबाकीदारांचे सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. या बरोबरच केंद्रातील मोदी सरकारने ६.६६ लाख कोटी रुपयांचे कर्ज सन २०१४ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान माफ केले असाही आरोप काँग्रेसने केला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली होती. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट होतं. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं होतं. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी यासाठी ही माहिती मागवली होती कारण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी आरटीआय अंतर्गत हा अर्ज केल्याचं त्यांनी सांगितले होते.

 

News English Summary: Former Congress president Rahul Gandhi has once again attacked the Modi government at the Center. Rahul Gandhi has attacked the overall policies of the Modi government. He tweeted, “Minimum government and maximum privatization, Covid is just one reason, government office workers want to be free.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi slams Modi government over national policy Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या