21 April 2025 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

फडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत

Former CM Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Eknath Khadse, Marathi News ABP Maza

जळगाव, ६ सप्टेंबर : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.

खडसे पुढे म्हणाले की, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनते समोर आणणार आहे.

भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात येण्याची खुली ऑफर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना सत्तार यांनी खडसेंना बाहुबलीची उपमा दिली.

सत्तार म्हणाले की, “कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं पुन्हा पुन्हा सांगायला नको. खडसे यांच्या भाजपामध्ये अन्याय झाला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती तुटली. आता खडसे यांनी भाजपा पक्ष सोडून शिवसेनेत यावे. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल. आम्ही शिवसेनेत त्यांचे स्वागत करु” असं सत्तार म्हणाले.

 

News English Summary: Besides, Devendra Fadnavis has run the government with Deputy Chief Minister Ajit Pawar for three days. Therefore, he has fired a cannon at them saying that they cannot criticize him for spending his morals.

News English Title:  Former CM Devendra Fadnavis will not target Deputy Chief Minister Ajit Pawar said Eknath Khadse Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या