22 November 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

देशात कोरोनाचा विस्फोट | एकाच दिवसात तब्बल 90 हजार 802 रुग्णांची नोंद

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे.

तर, सध्या देशात 8 लाख 82 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 32 लाख 50 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मृतांचा आकडा हा 71 हजार 642 झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरपर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार चाचण्या करण्यात आल्या. यात एकाच दिवसात 7 लाख 20 हजार चाचण्या झाल्याची नोंद आहे.

देशाच्या ३५ जिल्ह्य़ांतील करोना परिस्थितीचा आढावा नुकताच घेण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच बाधितांचा शोध घेताना अन्य आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देण्यात आल्या. तसेच पहिल्या टप्प्यातील रुग्णनिदान करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आणि ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

 

News English Summary: For the second day in a row, India has added more than 90,000 infections. With 90,802 new cases reported in the last 24 hours, the tally in India has now breached the 42 lakh mark. Of the 42,04,614 cases, over 32 lakh patients have been discharged, while nearly 8.9 lakh infections are still active.

News English Title: Indias Covid19 Case Tally Crosses 42 Lakh Mark With A Spike Of 90802 New Cases Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x