22 November 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनावर नियंत्रण येईपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल | मुलांवर काम किंवा भीक मागण्याची वेळ येईल

Raghuram Rajan, GDP Numbers, Indian Economy, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : देशाचा GDP उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरल्यानं चिंता वाढली आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे.

रघुराम राजन यांनी त्यांच्या लिंक्डइन पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला आहे. अजून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर व्हायचा आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था आणखी बिकट होईल, अशी भीती राजन यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोपर्यंत फारसा खर्च करता येणार नाही, असं यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करून परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘अर्थव्यवस्था एखादा रुग्ण असल्याची कल्पना केल्यास तर त्या रुग्णाला सातत्यानं उपचारांची आवश्यकता आहे. दिलासा न मिळाल्यास लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. ते मुलांना शिकवू शकणार नाहीत. मुलांवर काम करण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येईल. कर्जासाठी लोकांना त्यांच्याकडे असणारं सोनं गहाण ठेवावं लागेल. ईएमआय, घरभाडं देणं कठीण होईल. लहान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल आणि त्या बंद होतील. अशा प्रकारे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल,’ असं राजन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दुसरीकडे, २१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकऱ्या, कामाचं स्वरुप यामध्ये होणाऱ्या बदलांची चर्चा होते आहे. अशात कौशल्य आणि ज्ञान यावर आधारित शिक्षण धोरण असणं हे अत्यावश्यक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा संदर्भातल्या परिषदेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.

नव्या शिक्षण धोरणाचं महत्त्व यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशद केलं. ते म्हणाले नवं शिक्षण धोरण हे स्टडिंग ऐवजी लर्निंगवर फोकस करणारं आहे. तसंच अभ्यासक्रमापेक्षाही या धोरणात आव्हानात्मक विचारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर विविध भाषांवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान कसं प्राप्त होईल यावर नव्या शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: Former Reserve Bank of India (RBI) Governor Raghuram Rajan has said the government will have to expand its resources in every way possible, spending as cleverly as possible to bring the economy back to pre-pandemic GDP levels. Rajan, in his LinkedIn post published on Sunday, stated that the Centre has “to take every action that can move the economy forward without additional spending.”

News English Title: Need To Be Frightened Out Of Complacency says Raghuram Rajan On GDP Numbers Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raghuram Rajan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x