22 November 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

७० वर्षात जे काही उभं केलं होतं | ते सगळं हे विकून टाकणार | काँग्रेसचा घणाघात

Congress party, PM Narendra Modi, Disinvestment Policy, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटात डळमळीत झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमांत (PSUs) आपली भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यानुसार २७ जुलै २०२० रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याला मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. सीतारमण यांनी खासगीकरण करण्यात येणाऱ्या २३ सरकारी कंपन्या कोणत्या आहेत, याबाबत काहीच सांगितले नव्हते. मात्र, सरकार आपली भागीदारी २३ नव्हे तर २६ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील विकत असल्याचे माहिती अधिकाराखालील (आरटीआय) विचारणेत उघड झाले आहे. यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत सरकारनं आधीच काही सार्वजनिक कंपन्यातीली हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. “देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहे. ७० वर्षात जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार. आणि मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते… ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

 

News English Summary: The government has already sold stakes in some public companies, insisting on a disinvestment policy. Now the government has decided to privatize 26 more companies. Union Finance Minister Nirmala Sitharaman has announced this. With this decision, Congress has targeted Modi.

News English Title: Congress party Slam To PM Narendra Modi On Disinvestment Policy Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x