22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

प्रणवदा म्हणालेले शिवसेनाप्रमुखांमुळे राष्ट्रपती झालो | काहीजण रात गयी बात गयी - मुख्यमंत्री

tribute to Pranab Mukherjee, CM Uddhav Thackeray, pinched the BJP, Marathi News ABP Maza

मुंबई , ७ सप्टेंबर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. पण अनेकांना रिपोर्टसाठी ताटकळतच राहावं लागलं.

सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्याने आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले. पण स्वॅब घेऊनही अनेकांचे रिपोर्ट न मिळाल्याने विधिमंडळ गेटवर आमदारांमध्ये गोंधळ उडाला. २४ तासानंतरही आमदारांच्या चाचणीचा अहवाल आला नाही. त्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हतं. सरकारने एजेंट ठेवलेत का? अशा शब्दात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी श्रद्धांजली अर्पण केलीय. यावेळी त्यांनी प्रणव दांच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले.प्रणव दांचे कुणाशी वैर नव्हते. भाषणबाजी पेक्षा त्यांना काम जास्त महत्वाचे वाटे. प्रणवदा यांनी अनेकदा त्याकाळी सरकारला वाचवलं, पक्षाला वाचवल्याचे मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेत म्हणाले.

जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती. समोरच्याचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या.

एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले. भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं. ते म्हणाले मला वाटलं नव्हतं मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे असं त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी ,खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.

 

News English Summary: The monsoon session of the legislature has started from today. The corona has been tested on all MLAs, officials-employees to prevent the impact on the convention against the backdrop of the corona. All who attended the convention on Saturday and Sunday were tested. But many had to wait for the report.

News English Title: While paying tribute to Pranab Mukherjee the Chief Minister Uddhav Thackeray pinched the BJP Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x