22 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

भारत सरकारला कर्ज देणाऱ्या LIC'ला पैशाची गरज | मोदी सरकार २५ टक्के हिस्सा विकणार

LIC IPO, Modi Govt

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : दरम्यान, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा IPO आणण्याच्या प्रक्रियेला सरकारने वेग दिला आहे. पण शेअर बाजारात त्याची लिस्टिंग वेगळी असू शकते. सीएनबीसी आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सरकारी विमा कंपनी LICचा आयपीओ आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध होऊ शकते.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा 25 टक्के हिस्सा विकण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सरकार किरकोळ गुंतवणूकदारांना बोनस आणि सवलत देण्यावर विचार करीत आहे. वित्तीय सेवा विभागाने LICमधील भागभांडवल विक्रीचा आराखडा तयार केला असून तो सेबी, आयआरडीए आणि एनआयटीआय आयोगासह संबंधित मंत्रालयांना पाठविला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती असलेल्या एकानं सांगितले की, कंपनीला भागभांडवल 100 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत कमी करावयाचे आहे.

एलआयसीमधील एकूण भागभांडवल 25% पर्यंत सरकार वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये विकू शकते, असे सूत्रांनी सांगितले. लिस्टिंगनंतर 3 वर्षांच्या आत किमान सार्वजनिक भागभांडवल 25% पर्यंत वाढवणे आवश्यक आहे. सुरुवातीला एलआयसी बोनसदेखील देऊ शकते. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचारी 10% पर्यंत सूट मिळवू शकतात. एलआयसी कायदा 1956मध्ये भांडवल आणि व्यवस्थापन संबंधित मोठे बदल प्रस्तावित आहेत. जारी केलेली कॅबिनेट ड्राफ्ट नोट लवकरच मंजूर होईल. संसदेच्या पुढील अधिवेशनात या कायद्यातील बदल मनी बिलाच्या स्वरुपात मांडले जाऊ शकतात.

दुसरीकडे देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.

“मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 

News English Summary: The buzz around the much-awaited initial public offering (IPO) of public insurer Life Insurance Corporation (LIC) has intensified. The government is looking to offload as much as 25% in LIC IPO which is set to be one of the largest in India. The 25% stake sale will occur in two tranches.

News English Title: LIC IPO latest news government of India may sell up to 25 percent stake Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x