23 November 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | हे वाचल्यावर समजतील फायदे | केळ्यावर असे डाग आले म्हणून फेकणार नाही

Benefits,  Black spotted Bananas, Health Fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : साधारणपणे केळ्यावर असे डाग दिसले तर लोक त्यास खराब समजून फेकून देण्याची चूक करतात. वास्तविक ही केळी खराब नव्हे तर पूर्णपणे पिकलेली असतात म्हणून त्याला डाग दिसतात. ज्या केळ्यावर हे काळे डाग दिसतात ती खरेतर इतर केळ्यांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. चला तर पाहूया अशी केळी खाल्ल्याचे फायदे काय काय असतात ते:

पोटाचे विकार दूर करतात:
या केळ्यांमध्ये अशी पोषक तत्वे असतात ज्यांमुळे पोट साफ राहाते आणि पोटाचे विकार दूर होतात. या केळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते ज्यांमुळे आपली पचनयंत्रणा मजबूत राहाते. यांत मोठ्या प्रमाणावर मेग्नेशियमही असते ज्यांमुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात जसे कि बद्धकोष्ठ, किंवा वाताची समस्या. यांत अशी अनेक पोषक तत्वे असतात ज्यांमुळे पोटाच्या ट्युमरवर प्रभाव पडतो. अनेक पोषक तत्वे असल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

बुद्धी:
यांमुळे तुमच्या बुद्धीलाही चालना मिळते. विद्यार्थ्यांनी याचे सेवन नक्की करावे. जर तुम्ही परीक्षा देण्यास जात असाल तर नक्की त्यापूर्वी हे केळे खा.

अधिक उर्जा मिळते:
या केळ्यांमुळे अधिक उर्जा मिळते. जर तुम्ही मैदानी खेळ खेळत असाल तर नक्की या केळ्यांचे सेवन तुम्ही करायला हवे. तुम्हाला अशक्त वाटत असेल किंवा अधिक ताणतणाव वाटत असेल तरी या केळ्यांनी तुम्हाला फायदा होईल.

रक्तदाब:
जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर ही केळी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. यांमुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होईल तसेच रक्तदाब नियंत्रणात येईल. म्हणून ही केळी टाकून न देता तुम्ही त्यांचे सेवन करायला हवे.

हाडांसाठी फायदेशीर:
तुमच्या हाडांसाठी ही केळी फार उपयुक्त आहेत. ही केळी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतात. यातून तुमच्या शरीराला अतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा होईल जेणेकरून तुमची हाडे व दात मजबूत होतील. यांमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.

 

News English Summary: Health enthusiasts swear by the many health benefits of bananas. You can add them to your smoothies, protein shakes, or just eat one to subdue those excruciating hunger pangs. Yet, we regularly pass on bananas that become too spotted. However, recent research in Japan has found some incredible benefits of these very same spotted bananas that usually find their place in the bin. Take a look at the benefits below.

News English Title: Benefits of black spotted Bananas Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x