कंगना समाज माध्यमांवर धार्मिक तेढ वाढवतेय ? | स्वतःच्या अनधिकृत कार्यालयाची राम मंदिराशी तुलना

मुंबई, ९ सप्टेंबर : आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
कंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मोजणी केली होती. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध सुरू असताना आता कंगनाचं मुंबईतील कार्यालय महापालिकेच्या रडारवर आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आता अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला लागली आहे. त्यासाठी बुलडोझर आणि हातोडे घेऊन कर्मचारी कंगनाच्या कार्यालयाकडे पोहोचले आहे.
मात्र त्यानंतर कंगना संतापल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. ‘मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,’ असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
News English Summary: The ongoing face-off between Bollywood actor Kangana Ranaut and Maharashtra government continued on Wednesday (September 9) with the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) officials demolishing alleged illegal alterations at Kangana’s Manikarnika Films office in Mumbai’s posh Pali Hill area. Responding to BMC’s move, Kangana compared her office to Ram Temple and said that Babar is demolishing it.
News English Title: Kangan Ranaut called her Mumbai office Ram Mandir Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA