19 April 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध खालच्या पातळीवरील हॅशटॅग अभियान | ट्विटरवर टॉप ट्रेन्ड

CM Uddhav Thackeray, Kangana Ranaut, Twitter, Top Trending, Marathi News ABP Maza

मुंबई, १० सप्टेंबर : कंगना रानौतचे उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले सुरूच आहेत. ट्विटवरून ती उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत पातळीवर बदनामी कशी करता येईल याचीच काळजी घेताना दिसत आहे. त्यात तिला समाज माध्यमांवर भाजप समर्थकांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाल्याने ती दर काही मिनिटांनी विवादित ट्विट करत आहे. थेट स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या आडून तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विखारी शब्दात लक्ष केलं आहे.

एका ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे की, “तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर तुम्हाला कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्यानंतर शंभर आणि लाखोंमध्ये प्रतिध्वनित होईल. तुम्ही किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचा आवाज दाबणार? सत्यापासून कधीपर्यंत पळणार? तुम्ही घराणेशाहीच्या एका नमुन्याशिवाय काहीच नाही,” अशा शब्दांत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचसोबत अनेक मराठी मित्रमैत्रिणींचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचं कंगनाने सांगितलं.

कंगनाचे समर्थक देखील उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवरील हॅशटॅग वापरून त्यांची बदनामी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून #महाराष्ट्र_का_CM_नपुंसक_है हा हॅशटॅग कंगणाच्या समर्थकांनी टॉप ट्रेंडमध्ये ठेवला आहे. अजूनही त्यावर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांची प्रतिमा जास्तीत जास्त कशाप्रकारे मलीन करता येईल यावर अभियान सुरु असल्याचं दिसतं आहे.

 

News English Summary: All eyes were on Kangana Ranaut as her flight landed at Mumbai airport on Wednesday afternoon from Chandigarh. She was returning to the city for the first time following her controversial remarks against Mumbai police and a war of words with the Shiv Sena.

News English Title: Kangana Ranaut supporters campaign against CM Uddhav Thackeray on Twitter in top trending Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या