कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८०% रुग्णांना आरोग्याबाबत गंभीर इशारा
नवी दिल्ली, १० सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आरोग्याबाबत महत्वाचं भाष्य करताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र असे असले तरी कोविड-१९ ला गांभीर्याने न घेण्याची चूक करू नका, कारण कोरोनावर मात केल्यानंतरही ६० ते ८० टक्के लोकांमध्ये काही ना काही समस्या दिसून येत आहेत. ही समस्या अंगदुखीसारखी सामान्यही असू शकते. मात्र चिंतेची बाब म्हणजे काही रुग्णांमध्ये फुफ्फूस आणि हृदयासंबंधीच्या समस्याही दिसून येत आहेत.
नॅशनल ग्रँड राऊंड -७ ऑनलाइन कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉक्टरांनी सज्ज राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांची फुप्फुसे कमकुवत होत आहेत. त्यामुळे त्यांना दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनची गरज भासू शकते. अशा रुग्णांच्या फुप्फुसामध्ये फाइब्रोसिसची गंभीर समस्या दिसून येत आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची फुप्फुसे खराब झाली होती. त्यांना फुप्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला आहे. हल्लीच यापैकी एका रुग्णावर फुप्फुस प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया झाली आहे.
News English Summary: While commenting on the importance of health, Dr. Randeep Guleria said the corona virus causes mild symptoms in many patients. However, don’t make the mistake of taking Covid-19 seriously, because even after overcoming Corona, 60 to 80 percent of people still have some or the other problem.
News English Title: AIIMS director general warns 80 per cent of corona patients about health Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल