22 November 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

शिवकालीन गडकिल्यांची दुरावस्था | आ. राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

MNS MLA Raju Patil, CM Uddhav Thackeray, Fort Poor Condition, Marathi News ABP Maza

कल्याण, ११ सप्टेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून उद्विग्न झालेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही,’ अशी भावना पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

“सत्ताधारी शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र, गड-किल्ल्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक महत्व दिले जात असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे”, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

प्रतापगडावर दरड कोसळून तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. विशाळगड, पन्हाळगडावर पडझड झाली आहे. विजयदुर्गची तटबंदी ढासळली आहे. हे सगळं पाहिल्यावर छत्रपतींचे नाव घ्यायची खरंच आपली योग्यता आहे का? असा प्रश्न पडतो, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, पुरातत्व खाते केंद्राकडे आहे, त्यामुळे आपण काहीच करणार नाही अशी बोटचेपी भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार असेल तर हा इतिहास नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. तसेच, छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असे म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.

 

News English Summary: MNS MLA Raju Patil has written a letter directly to Chief Minister Uddhav Thackeray. Concerned about the dilapidated condition of the forts built by Chhatrapati Shivaji Maharaj and a living witness of Shiva-era history, reason MNS MLA Raju Patil has written a letter directly to Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: MNS MLA Raju Patil write letter to CM Uddhav Thackeray on fort development Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x