22 April 2025 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

माफिया म्हटलं त्यांच्या संरक्षणात कंगनाची ट्विटवर टिवटिव | कोरोना ते कंगणा फक्त कर्तव्य

Kangana Ranaut, Mumbai Police, Security, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर कंगनानं प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, बी-टाऊनमधील अनेक बड्या कलाकारांवरही कंगनानं आरोप केले होते. आता तर तिनं थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडलं होतं. भाजप नेते राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं म्हटलं होतं. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको,’ असं ट्विट तिनं केलं होतं.

त्यानंतर ९ तारखेला मुंबई विमानतळावरुन कंगना रणौत थेट आपल्या घरी पोहोचली होती. पोलिसांच्या सुरक्षेत कंगना आपल्या घरी पोहोचली. तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या मुंबई पोलिसांना तिने माफिया म्हटलं होतं त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतच कंगणा २४ तास ट्विटरवर टिवटिव करत आहे.

कोरोनाच्या आपत्तीत कर्तव्य बजावताना शेकडो मुंबई पोलिसांनी स्वतःचा जीव गमावला आहे तर हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोरोना असो की कंगना…पोलीस त्यांचं कर्तव्य निभावताना जराही उसंत घेताना दिसत नाहीत हे सत्य आहे.

 

News English Summary: Kangana Ranaut was reached her home under police protection. Mumbai police have cordoned off the area outside her house. Apart from this, Kangana Ranaut has been given Y Plus grade security. Meanwhile, Kangana Ranaut has been tweeting on Twitter 24 hours a day under the security arrangements of the Mumbai police which she had termed as mafia.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut safe under security of Mumbai Police Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या