22 November 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

भारतातील तब्बल १० हजार प्रमुख व्यक्तींवर चीनची पाळत | कंपनीच्या माध्यमातून पाळत

China India, Indian individuals, Watch, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर : लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनकडून भारताविरुद्ध सायबर युद्धाच्या हालचाली सुरु आहेत. त्यासाठी चीनमधील झेन्हुआ या कंपनीकडून भारतातील जवळपास १० हजार नामवंत व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवली जात आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

झेन्हुआ या कंपनीने आपण हायब्रीड वॉरफेअरमधील नव्या तंत्रज्ञानाचे जनक असल्याचा दावा केला आहे. आपण चीनच्या पुनरुत्थानासाठी हे करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे झेन्हुआ कंपनीचे चिनी सरकारशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून चिनी सरकार भारतातील प्रमुख व्यक्तींवर पाळत ठेवत असल्याचा दाट संशय आहे. भारत-चीन यांच्यातील सद्य तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत चिंतेची मानली जात आहे.

राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ‘झेनुआ’ कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘अ‍ॅप’चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे.

चिनी कंपन्या या व्यक्तींची डिजिटल लाइफ फॉलो करत आहे. तसेच या व्यक्ती आणि त्यांचे पाठीराखे कशाप्रकारे काम करतात, यावर लक्ष ठेवले जात आहे. चिनी कंपन्या या सर्वांचा रियल टाइम डेटा एकत्रित करत आहेत. ही माहिती चीन सरकारला पुरवली जात आहे. राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिकांसोबतच खेळाडू, पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईंकांवरही लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचीही हेरगिरी केली जात आहे.

शेनजान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने चीन सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीसोबत मिळून ओव्हरसीसचा एक इन्फॉर्मेशन डाटाबेस बनवला आहे. त्याअंतर्गत ही संपूर्ण काम केले जाते, असा दावा इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या या वृत्ता करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांकडून मिळवण्यात येत असलेल्या या माहितीला चिनी कंपन्यांकडून हायब्रेड वॉर असे नाव देण्यात येते. एकीकडे एलएसीवर चिनी सैन्य भारतील लष्कराला युद्धासाठी चिथावणी देत आहे. तर दुसरीकडे चिनी कंपन्या भारताविरोधात डिजिटल युद्ध करत असल्याचे या माहितीवरून समोर येत आहे.

 

News English Summary: Calling itself a pioneer in using big data for “hybrid warfare” and the “great rejuvenation of the Chinese nation,” a Shenzen-based technology company with links to the Chinese government, and the Chinese Communist Party, is monitoring over 10,000 Indian individuals and organisations in its global database of “foreign targets,” an investigation by The Indian Express has revealed.

News English Title: China keep watch on 10000 Indian individuals including PM Modi and Chief Minister Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x