5 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

आज मोदींचा वाढदिवस | समाज माध्यमांवर राष्ट्रीय बेरोजगार दिन ट्रेण्डमध्ये

National unemployment day, PM Modi birthday, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच आणि #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे. या दोन्ही हॅशटॅगवर १० लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.

करोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख २८ हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर ८ लाख ३७ हजार ट्विट करण्यात आले आहेत.

 

News English Summary: Week-long celebrations in the name of ‘Seva Saptah’ were launched by BJP from Sept 14-20 in view of PM Narendra Modi’s birthday. PM Narendra Modi has turned 70 today, i.e. September 17. On the other hand, netizens on Twitter have marked September 17 as National Unemployment Day and the trend has gone viral.

News English Title: National unemployment day trends on PM Modi birthday Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x