22 November 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

थाळी वाजवणं, दिवे लावण्यापेक्षा कोरोना योद्ध्यांची सुरक्षा व सन्मान महत्वाचा - राहुल गांधी

Congress Leader Rahul Gandhi, PM Narendra Modi, Coronavirus, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करोनाची लागण झालेल्या, तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही. जे पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत मागणी करतात त्यांची माहिती राष्ट्रीय स्तरावर ठेवली जात असल्याची माहिती,” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी दिली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

“प्रतिकूल डेटा मोदी सरकार. .. थाळी वाजवणं, दिवे लावणं यापेक्षा अधिक गरजेचं त्यांची सुरक्षा आणि सन्मान आहे. मोदी सरकार, करोना योद्ध्यांचा इतका अपमान का?,” असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यावर टीका करत संताप व्यक्त केला.

राज्यसभेचे खासदार बिनॉय विस्वम यांनी अश्विनी कुमार चौबे यांना यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. आरोग्य सेवा कर्मचारी जसे डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्यापैकी किती जणांना करोनाची बाधा झाली आणि किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या १५५ आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामध्ये ६४ डॉक्टर्स, ३२ नर्सिंग स्टाफ, १४ आशा वर्कर्स आणि ४५ अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९६,४२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२,१४,६७८ इतकी झाली आहे. यापैकी १०,१७,७५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४१,१२,५५२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, आतापर्यंत देशातील ८४,३७२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी राज्यात २४,६१९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११,४५,८४० इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

तर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवलेल्या मुंबईतही आता पुन्हा एकदा रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८० दिवसांपर्यंत वाढला होता. मात्र, गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे.

 

News English Summary: It was reported that the Union Ministry of Health had no information about the health department employees who were infected with coronary heart disease and who died due to coronary heart disease. Health is a state subject and such information is not looked at at the central level by the Department of Health and the Ministry of Family Welfare. This has now been targeted by Congress leader and former president Rahul Gandhi.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi Government Health Workers Coronavirus Positive Death No Records Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x