कुरुक्षेत्र येथील शेतकऱ्यांच्या मोर्चावरील लाठी हल्ला भोवणार | जेजेपी भाजपवर नाराज
कुरुक्षेत्र, १८ सप्टेंबर : १० सप्टेंबररोजी, कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शेतकरी कृषी विधेयकाविरोधात मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईत बरेच शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत सरकारवर हल्ला चढविला. हरियाणात जेजेपी भाजपासोबत सत्तेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे जेजेपी आमदारांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. त्यात हरसिमरत यांनी आपली खुर्ची सोडल्याने दुष्यंत चौटाला यांच्यावरील दबाव वाढला आहे.
शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या गोंधळात अडकले आहेत. हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी युतीचे सरकार आहे. हरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या पंचायती होत असून या विधेयकाविरोधात त्यांचा रोष सतत वाढत आहे.
शेतकर्यांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यापूर्वीच उपमुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करत होते आणि आता टोहानाचे आमदार देवेंद्रसिंग बबली यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दुष्यंत चौटाला यांच्या विरोधात थेट मोर्चा उघडला आहे.
दरम्यान, टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना कांदा सलग पाच ते सहा महिने ५०० ते ८०० रुपये क्विंटल दराने म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने विकावा लागला होता. तेव्हा सरकारने कांद्याचे दर वाढण्यासाठी कोणती हालचाल केली नाही. परंतु, आता कांद्यावर दोन तासात निर्यात बंदी केली आहे. म्हणजे निर्यात बंदी करताना दोन तास आणि निर्यातबंदी हटविताना १५-१५ दिवस मुदत द्यायची, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याकडे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले. कांदा उत्पादनात जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
News English Summary: With the exit of the Shiromani Akali Dal from the Center, pressure is mounting on the BJP’s ally Jananayak Janata Party (JJP) in Haryana. JJP chief deputy chief minister Dushyant Chautala is currently embroiled in controversy over farmers’ grievances. Haryana has a BJP-JJP coalition government. Haryana farmers are protesting against the Agriculture Bill.
News English Title: Pressure on JJP to leave from BJP Government in Hariyana after Akali Dal over farmers Issue Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार