22 November 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

हिंदू महिलांचे बिगर-हिंदू विवाह | लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी व्हीएचपी-RSS'चा दबाव

Vishwa Hindu Parishad, RSS, Love jihad, Marathi News ABP Maza

भोपाळ, १९ सप्टेंबर : तिहेरी तलाकावर कायदा करणाऱ्या मोदी सरकार पुढे हिंदू महिलांना वाचवण्याचे नवे आव्हान आहे. विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) बिगर-हिंदू विवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार आहे. हिंदुवादी संघटना अशा घटनांना लव्ह जिहाद म्हणतात. याला आळा घालण्यासाठी व्हीएचपी मोदी सरकारवर कायदा आणण्याचा दबाव टाकत आहे. भोपाळ येथे दोन दिवसीय व्हीएचपी बैठकीच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी एका अहवालावर चर्चा झाली. आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही यात भाग घेतला होता.

या अहवालात हिंदू महिलांनी बिगर हिंदूंवर, विशेषत: मुस्लिम तरुणांशी विवाह केल्याच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले आहे. हिंदू महिलांना फसवून मुस्लिम तरुणांशी केलेल्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले जाते. त्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. मुस्लिम तरुण हिंदू स्त्रियांशी नाव बदलून संपर्क करतात आणि लग्न होईपर्यंत वास्तव लपवतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये लग्नानंतर महिलांवर अमानुष छळ केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

दरम्यान सध्याच्या कायद्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ सारखी काही टर्मच नाही. ‘लव्ह जिहाद’ची परिभाषाच नाही आणि ‘लव्ह जिहाद’शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेलं नाही, असा खुलासा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. ४ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी हा खुलासा केला होता.

लव्ह जिहाद शब्दाची सध्याच्या कायद्यात परिभाषा करण्यात आलेली नाही. तसेच लव्ह जिहादचं एकही प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत आलेलं नाही, असं सांगतानाच एनआयएने केरळमधील दोन वेगवेगळ्या धर्मांशी निगडीत प्रकरणाचा तपास केल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं होतं. तसेच संविधानाने कोणताही धर्म स्वीकारण्याचं त्याचा प्रचार-प्रसार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे, असंही ते म्हणाले होते.

 

News English Summary: The Modi government, which has enacted a law on triple divorce, has a new challenge to save Hindu women. The Vishwa Hindu Parishad (VHP) will launch a nationwide campaign to curb the rising incidence of non-Hindu marriages. Hindu organizations call such incidents love jihad.

News English Title: Vishwa Hindu Parishad will pressurize PM Narendra Modi government make law to stop love jihad Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x