22 November 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे | IPS अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न - गृहमंत्री

Police IPS officials, Thackeray government, Anil Deshmukh, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ‘लोकमत’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता, असे देशमुख यांनी सांगितले.

लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले. ही संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यूट्युबवर’ आहे. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाºयांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहºयावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.

मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले. यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून तातडीने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

हे फेरबदल करताना भाजपच्या जवळच्या अधिकार्‍यांना कमी महत्त्वाच्या जागेवर बदली देण्यात आली, तर सरकारच्या मर्जीतील अधिकार्‍यांना चांगली जबाबदारी देण्यात आली. मुंबईतही अनेक मराठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकावरील गंडांतर तुर्तास टळल्याचे सांगितले जाते. देवेन भारती, एम. एम. रानडे, निशित मिश्रा, सुनील फुलारी, संजय कुमार बावीस्कर, मनोज कुमार शर्मा, महादेव तांबाडे, संदीप बिष्णोई यातील काही अधिकार्‍यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा होती. या अधिकाऱ्यांना नियुक्त्या न देता प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

छोट्या – छोट्या कारणांसाठी राज्यपालांकडे जाण्याचे काम विरोधी पक्षाकडून होत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. पण त्यांनी आता राजभवनावर एक रूम घेऊन राहावे. म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविषयी ते म्हणाले, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणून संबोधायचे, अशा गोष्टी करणाºयांचे मी नावही घेऊ इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना भाजप खतपाणी घालत आहे.

 

News English Summary: State Home Minister Anil Deshmukh has made a sensational claim that some IPS officers in the state had tried to overthrow the Mahavikasaghadi government. Anil Deshmukh made the revelation in an interview to Lokmat daily. In it, he said, four to five senior officers in the police force tried to overthrow the Mahavikasaghadi government.

News English Title: Police IPS officials tried to overthrow the Thackeray government said home minister Anil Deshmukh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x