22 November 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

ही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान

Parliament Monsoon Session, Farm Bills Agriculture Ordinances, Modi Govt, Marathi News ABP maza

नवी दिल्ली, २० सप्टेंबर : कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असं तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.

त्यानंतर सभागृहात काँग्रेससह विरोधी बाकांवरील पक्षांनी विधेयकांवरून सरकारवर टीका केली. द्रमुकेचे खासदार एलेंगोवन म्हणाले,”देशाच्या एकूण जीडीपीत शेतकऱ्यांचं योगदान २० टक्के आहे. त्यांना या विधेयकांद्वार गुलाम बनवलं जाईल. हे विधेयकं शेतकऱ्यांना मारून टाकतील आणि वस्तू बनवून टाकतील,” अशी टीका त्यांनी केली.

तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. याच दरम्यान विधेयकावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून निशाणा साधला आहे. विधेयकावरून काँग्रेसने सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकार आणत असलेले तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी “शेतकरी विरोधी तीन काळे कायदे भाजप आदेश (व्हिप) काढून मंजूर करेल, पण त्यांच्याकडे एकही उत्तर नाही” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The contentious farm bills that were passed in the Lok Sabha on September 17 have been moved in the Rajya Sabha by Union minister of agriculture and farmer welfare Narendra Singh Tomar. Farmers’ and Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill, 2020 and Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Bill, 2020 and Essential Commodities (Amendment) Bill, 2020 will become laws after the Upper House also passes them on Sunday.

News English Title: Parliament Monsoon Session Farm Bills Agriculture Ordinances Modi Govt Congress Oppositions Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x