28 April 2025 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 29 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

शेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र

Agriculture bill, Devendra Fadnavis, Congress, Marathi News ABP Maza

नागपूर, २१ सप्टेंबर : शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.

हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले.

काल संसदेने दोन बील पास केले ते पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेजमधून थेट माल विकता येत नव्हता. बाजार समितीत शेतकऱ्यांना कर द्यावा लागायचा. माल कुठे विकला जावा, किती किंमत असावी ? यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नव्हते. सिंगल मार्केट झाल्याने देशाच्या कोणत्या कोपऱ्यात माल विकायचा आणि किती किंमतीत विकायचा हे शेतकरी ठरवतील. त्यामुळे ही दोन्ही बीलं क्रांतीकारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

तर दुसरीकडे फडणवीस यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. ‘शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. त्यांना अनेक मुद्द्यांवर भूमिकाच घेता येत नाही आणि आता तर त्यांना त्यांची सवयही झाली आहे. यात आम्हालाही आता नवल वाटत नाही,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विषयक विधेयकांच्या संदर्भात ते नागपूरमध्ये बोलत होते. ही विधेयके ऐतिहासिक असून यामुळं शेतकरी आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो, असं फडणवीस म्हणाले. कृषी विधेयकाला शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला. ‘ही विधेयके इतकी क्रांतिकारक आहेत तर यापुढं कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी सरकार देणार का, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis said that the Congress ‘objection to the farmers’ bill was false and that it was a hoax. The Congress and its allies rallied yesterday over the Farmers’ Bill. The country’s parliament has never seen such behavior.

News English Title: Farmer bill opposition leader Devendra Fadnavis political attacked on congress Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या