महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या १२ तासांत | तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा
मुंबई, २३ सप्टेंबर : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचं धुमशान सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाही.
मुंबईत उद्भवलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. सप्टेंबरमध्ये जितका पाऊस होतो तितका एका दिवसांत म्हणजेच 80 टक्के पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर मुंबईत पंपिंग स्टेशनसोबत आता मुंबईत फ्लड कंट्रोल टॅंक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी जमिनीचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
“मुंबईत गेल्या 24 तासात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही वैयक्तिक लक्ष आहे. दादर आणि धारावी परिसरात अवघ्या 12 तासात तब्बल 332 मिमी पाऊस कोसळला. गेल्या 24 तासात मुंबईत एका तुळशी तलावाइतके म्हणजे सुमारे साडेसहा ते पावणेसात हजार दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा उपसा करण्यात आला”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
“वेगवेगळ्या उदंचन केंद्र तसेच ठिकठिकाणच्या उदंचन संचांद्वारे (पंप) पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होऊ लागला आहे. मुंबईतील मोगरा आणि माहूल या दोन पर्जन्यजल उदंचन केंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी निचरा आणखी वेगाने होईल. असं असलं तरी त्यावर न थांबता नवीन पर्यायही शोधण्यात येत आहेत”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
News English Summary: State Environment Minister Aditya Thackeray visited the Disaster Management Department at the Mumbai Municipal Corporation Headquarters. It rained as much as 80 per cent in one day as it did in September. Against this backdrop, there are plans to set up a flood control tank in Mumbai along with a pumping station in Mumbai.
News English Title: State minister Aaditya Thackeray visits BMC control room after heavy rains in Mumbai Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो